Apr 26, 2013

Friends katta poem - मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात

Hey friends, in this world of technology we all are far away from katta, katte pe baithke chai pena, patte khelna. Whatsap, 3 Patti and other android apps are now new place for friends. If you are also missing our old life with friends then you must read this poem. Its awesome. Leave comments.


मित्रांचे कट्टे
आजकाल ओसच पडतात.

कुणी 'Whats up' वर तर

कुणी 'Facebook' वर जमतात.

प्रत्यक्ष भेटीत सगळेच
बुचकळ्यात पडतात.

कारण सगळे विषय 'Chat' वरच
संपलेले असतात.

मग 'Chat' वर भेटूच

याचं 'Promise' होतं.

आणि

संभाषणातून 'Sign out' केलं
जातं.

‘लाल’ ‘हिरव्या’

दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला
होतं.

घट्ट पकडलेल्या हातानांही सैल
सुटायला होतं.''

Available'’
आणि
'Busy' मध्येप्रत्येकाचा

'Status' घुटमळत राहतो.

आपणहून 'Add'
केलेल्या मित्रापासून

लपण्याकरिता'Invisible'चा
आडोसा घेतला जातो.

ताप आल्याचं आजकाल आईच्या
आधी 'Facebook'ला कळतं.

औषधापेक्षा 'Take Care'च्या
डोसेजनीच तापालाही पळायला
होतं.

मनातलं सगळं 'Facebook'
वर ओकायची मैत्रीत गरजच
का असावी?

नात्यांना धरून ठेवायला'Net'ची
जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर
जमावं.

'Chat'ला गप्पांनी

आणि

'Smile'ना
हास्यांनी 'Replace' करावं.

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य
जास्त असतं.

मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं.

चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा
अनुभवूया.

मैत्रीला 'Technology' पासून
जपून ठेवूया ...