Jul 18, 2013

rainy picnic spots near mumbai

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. 
रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.

कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही
औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या
ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंब
ईपासून अगदी हाकेच्या
अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना
सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या
मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला
सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे
ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे
लागते.

- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी
डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा
धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ
असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय
नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या
धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट
देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत
असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या
पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा
मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत
असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.

- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि
पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.

- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला
मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून
येतात.

- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक
रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा
किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी
शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची
पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास
खाण्याची सोय नाही.

- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही
आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा
आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे.
इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध
आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना
पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण
ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट
आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या
आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा
आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे
त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच
कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे
गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी
भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण
करून देतात.

- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात
खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर
घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट
झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यास

Above is the list of all famous and  best picnic spots during rain / monsoon. Even I would love to visit all such places. have fun mumbaikar.


Apr 26, 2013

Friends katta poem - मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात

Hey friends, in this world of technology we all are far away from katta, katte pe baithke chai pena, patte khelna. Whatsap, 3 Patti and other android apps are now new place for friends. If you are also missing our old life with friends then you must read this poem. Its awesome. Leave comments.


मित्रांचे कट्टे
आजकाल ओसच पडतात.

कुणी 'Whats up' वर तर

कुणी 'Facebook' वर जमतात.

प्रत्यक्ष भेटीत सगळेच
बुचकळ्यात पडतात.

कारण सगळे विषय 'Chat' वरच
संपलेले असतात.

मग 'Chat' वर भेटूच

याचं 'Promise' होतं.

आणि

संभाषणातून 'Sign out' केलं
जातं.

‘लाल’ ‘हिरव्या’

दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला
होतं.

घट्ट पकडलेल्या हातानांही सैल
सुटायला होतं.''

Available'’
आणि
'Busy' मध्येप्रत्येकाचा

'Status' घुटमळत राहतो.

आपणहून 'Add'
केलेल्या मित्रापासून

लपण्याकरिता'Invisible'चा
आडोसा घेतला जातो.

ताप आल्याचं आजकाल आईच्या
आधी 'Facebook'ला कळतं.

औषधापेक्षा 'Take Care'च्या
डोसेजनीच तापालाही पळायला
होतं.

मनातलं सगळं 'Facebook'
वर ओकायची मैत्रीत गरजच
का असावी?

नात्यांना धरून ठेवायला'Net'ची
जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर
जमावं.

'Chat'ला गप्पांनी

आणि

'Smile'ना
हास्यांनी 'Replace' करावं.

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य
जास्त असतं.

मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं.

चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा
अनुभवूया.

मैत्रीला 'Technology' पासून
जपून ठेवूया ...

Jan 29, 2013

amchi mumbai kavita - marathi poem bombay

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय.
८ रूपयाला वडापाव आणि १० रुला चाय.
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय.
आणायची ९० रु किलोची चिकन. सांगायच
बोकडाच मिळतच नाय.
अहो पगार कमी सांगुन इज्जत
गमवायची नाय.
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय..!!


सकाळी सकाळी ९ वाजता उठायच.
बिना तोंड धुता खिडकित यायच..
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय...
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय..
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच
राँग नंबर लागला की काय..
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय..!!


रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्ते
बाइक वाल्यांची किर किर,
फेरीवाल्यांची दादागिरी,
सडलेली कोथिम्बिर,
कच्च कुच्च वडापाव,
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन..
पर प्रान्तियानाच म्हनायच भाय..
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय..!!


पान्यासाठी पळायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा.
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा.
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आतमधे
आणि बाहेरच लटकतात पाय.
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..!!


काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय..
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय..
आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..!!


गरिबाच पोट आणि दुधावरली साय..!!