Nov 20, 2008

marathi poem friendship

Friendship poems in Marathi


Hi checkout the marathi kavitas for friendship.

मैत्री असावी फ़ुलासारखी
नाजुक, सुंदर, गोजिरी;
मात्र नसावी कोमेजून जाणारी!

मैत्री असावी इंद्रधनुसारखी,
सप्तरंग उधळणारी;
पण नसावी भासमान, नष्ट होणारी!

मैत्री असावी हिऱ्यासारखी,
अनमोल अन कठीण;
मात्र नसावी श्रीमंती रुबाब दाखवणारी!

मैत्री असावी रेशमासारखी...
दोन मनांना हळुवार जोडणारी;
पण प्रयत्न करुनही न तुटणारी!

मैत्री असावी पाण्यासारखी
शुद्ध, निर्मळ, त्रुप्त करणारी;
मात्र नसावी वाहून जाणारी!

मैत्री असावी चंदनासारखी
अलौकिक सुगंध देणारी;
मात्र नसावी झिजून जाणारी!

मैत्री असावी आईस्क्रिमसारखी गोड,
मौज उधळणारी;
मात्र नसावी वितळून जाणारी!

-----------------------------------------------------------------------------

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

--------------------------------------------------------------------------------

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री
सुखदुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री
ठेचकाळून पडताना सावरणारा हात म्हणजे मैत्री
पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध मैत्री
रणरणत्या उन्हात फुलणारा गुलमोहर मैत्री
अव्यक्त भावनांना मूर्त रुप देणे म्हणजे मैत्री
शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री
जन्मांतरीच्या साथीचे आश्वासन म्हणजे मैत्री
निखळ, निरलस, निरपेक्ष, निराकार मैत्री
आदि पासून अंतापर्यंत शब्दनिर्बन्ध अशी .... फक्त मैत्री ... फक्त मैत्री

--------------------------------------------------------------------------------

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

--------------------------------------------------------------------------------

जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल तर तुमच मनापासून स्वागत आहे

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

--------------------------------------------------------------------------------

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री
स्वप्न

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

--------------------------------------------------------------------------------

वर्ष सरतील.... सुख-दुःख सरतील....
एका नन्तर एक... त्या नन्तर एक...
.....आयुष्यातुन नाती आणी नातलगही सरतील....

क्षणाक्षणाच्या सुतानी विणलेली,
ऊन-वारयाशी सारखी झुन्ज देणारी,
आपली शाल कायम राहु दे......

.......माझ्या आयुष्यात एक तुझी मैत्री ही अशीच राहु दे

--------------------------------------------------------------------------------

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात... visarlis kay .........
miss u yaar................/

---------------------------------------------------------------------------------

एक थेंब .... पानावर सजलेला..
हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..

एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला,
धरती चुंबनाच्या प्रतीक्षेत तहानलेला..

एक थेंब .. कमळाच्या देठावर आधारलेला,
ओघलण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..

एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला,
आपणच तळे झालो या आनंदाने भारावलेला..

एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला,
गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..

एक थेंब ... थेंबाथेंबातून बरसलेला,
शिस्तीच आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..

एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला,
जिंकण्याची उमेद बाळगलेला..

एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला,
समांगाने फुलात उमलवून गेला..

एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला,
गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...

अन एक थेंब अखेर... आठवणीच्या स्पंदनातला,
ओल्या पापण्या अन ओल्या कडांतून मना ओलावलेला..

-----------------------------------------------------------------------------

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,

गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,

अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,

त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३

आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा !!

-----------------------------------------------------------------------------


मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे.
हा स्क्रैप मी फ़क्त माझे जे जिवलग मित्र मैत्रिणी आहेत त्यान्चेसाठिच आहे. आणि त्यातीलच तू एक आहेस याचा मला अभिमान आहे.


-----------------------------------------------------------------------------


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

असे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते?

असे म्हणतात की प्रेमात पडल्यावर
सर्व काही सुंदर असते
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते?

हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते
शोधून ही सापडत नसते
जसे की..........