marathi poem on friendship
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.
special friendship poem in marathi
No comments:
Post a Comment