Jun 15, 2010

marathi rain poem for kids - पाउस आला



पाउस आला की मजाच मजा असते. कधी कधी तर आईनी परवानगी दिली तर थोडा वेळ भिजता पण येत. ह्या कवितेत एक छोटासा बालक पावसाच वर्णन करत आहे अणि छत्रिशी गप्पा मारत आहे.



छत्रीबाई छत्रीबाई

पाउस आला

काळ्या छपरा खाली

घेतेस का मला?

टप टप टप

थेंब बघ वाजतात

काळ्या छपरावर

थुई थुई नाचतात

थुई थुई कारंजे

थड थड उडे

ढगातला पाउस

खाली पडे!

No comments:

Post a Comment