Mar 27, 2011

avadta prani gay - marathi nibandh essay

Funny Marathi Kavita (Poem) : आवडता प्राणी - 'गाय'

अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गायीला चार पाय आणि दोन कान असतात. गायीचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मारतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गायी-गायी करतात.

गाय दुध देते पण आम्ही चितळ्यांचे दुध पितो. गायीच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीलाताई शेणाच्या गौ-या करते.

गायीच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वासुरबारसेला वासराचे बारसे करतात.

गायीची पूजा होते. पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते.

गायीला माता म्हणतात.

भारत माता कि जय !

4 comments: