Badmash company movie pahilay na shahid ani chulbul anushka sharma cha? Nasel pahila tari ha dialog tar aikla aeslch > " Business bade Idea se bada hota hai.".
check this funny story in marathi, a proof of above dialog. :)
गावच्या आठवडे बाजारात एक व्यापारी आपला माल खपवत असतो. त्याची ही तर्हा वेगळीच असते.
व्यापारी : अक्कल वाढवायचं औषध घ्या, फक्त ५ रुपये, फक्त ५ रुपये, चला, चला, चला...लवकर घ्या, अक्कल वाढवा...फक्त ५ रुपये.
अनेक लोक हे अनोखं औषध पाहून व्यापार्याकडं यायचे.
त्यातलीच बाजार करायला आलेली एक व्यक्ती : ह्यानी खरोखरंच अक्कल वाढती का माणसाची???
व्यापारी : शंभर टक्के. एकदा घेऊन बघा. गुण नाही आला तर पैसे परत.
व्यक्ती : असं म्हणता, मग द्या बरं मला.
व्यापारी त्याला ५ रुपयाचं औषध देतो.
व्यक्ती : च्यामारी ssss हा तर गूळ हाय की.
व्यापारी : बघा औषध खाताच अक्कल आली का न्हाय???
No comments:
Post a Comment