प्रथम स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्षगाठीसाठी शुभेच्छा..........
उद्या १५ ऑगस्ट ना मित्रा…
आनंदाने भरून आलाय ऊर
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर…
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !
पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
“कौन बनेगा करोडपती” संपून
झालेत बरेच दिवस !
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका
उद्याच पडणार ठाऊक आहे
त्यांचा रंग फ़िका..!
मग म्हण “विविधतेत एकता”
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!
“मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .
No comments:
Post a Comment