धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
---------------------------------------------------------------------------
हातात हात घेउन चलणं सोप असतं पण.....
प्रेमत पडण सोप असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं.....
हातात हात घेउन चलणं सोप असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,
कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोप असतं
पण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं कठीणं असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोप असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून वटचालं
करणं मात्र कठीणं असतं
प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं सोप असतं
पण ती वचनं अणि शपथा निभवनं
मात्र फ़ारच कठीणं असतं
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं
पण खर बोलून प्रेम टीकवनं
मात्र नक्कीच कठीणं असतं
--------------------------------------------------------------------------
एकदा "BST" मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली
मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली
उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता
ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले
येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला
मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली
खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE"च असते
-----------------------------------------------------------------------
स्वप्ने ही आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना जपायची असतात
फुलांसारखी फुलवायची असतात
घरांसारखी सजवायची असतात
कारण स्वप्ने आपलीच तर असतात
रेशीम बंधाने त्यांना बाधायची असतात
मनातल्या मंदीरात पुजायची असतात
कधी कधीअश्रुंच्या पुरात वाहु द्यायची असतात
आठवणींच्या जगात कोठेतरी साकारायची असतात
पुर्ण झाली नाहित तरी शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना जपायची असतात
-----------------------------------------------------------------------
Deal Of The Day
Total Pageviews
Followers
Popular Posts
-
All funny puneri patya n jokes funny marathi boards Check out the collection of puneri patya and puneri jokes . Have unlimited Funnnnn.... ...
-
Bf: मला तुझे "दात" खूप आवडतात ... GF: अय्यां...खरच ..का रे ?? BF: कारण "yellow " माझा फेवरीट कलर आहे ---------...
marathi poem school kavita
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment