marathi jokes

Good marathis jokesJoke on reporter

एक पत्रकर एका कोकणस्थची मुलाखत घेत असतो.

तर पत्रकर विचारतो, "अहो मला एक सांगा, तुम्ही कोकणस्थ सगले जण चिंगुस (कंजुष) म्हणतात, ते का?"

तर तो कोकणस्थ म्हणतो:

"अरे, आता हे बघ माझ हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्ष वापरतो,

अजुन ५ वर्ष्यान्नी ते पुर्ण फाटेल,

मग मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी,

मग ती गोधडी फाटली की त्याचे लन्गोट करीन.

मग ते लन्गोट फटले की त्याचे पाय-पुसन करीन.

मग ते पाय-पुसन वापरुन वापरुन फाटल की मग त्याच्या वाती वलिन आणि

पन्ति मध्ये लाविन.

माग त्या वाती जलल्या कि जी राख उरेल त्या राखेने दात घासिन."


हे सर्व ऐकुन तो पत्रकार बेशुद्ध पडतो.

-------------------------------------------------------------------------
Enjoy SMSing in marathi - here are some good marathi jokes n SMS for your friends. Have fun...

जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस
...
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस!!!

-------------------------------------------------------------------------
Monkey joke

तू झाडावर चढू शकतोस का ?

संजीवनी आणू शकतोस का ?

छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?

नाही ना ?

... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!

-------------------------------------------------------------------------

आपत्तींची मालिका

२००२ : दहशतवाद

२००३ : पूर

२००४ : त्सुनामी

२००५ : भूकंप

२००६ : जलप्रलय

आणि आता

२००७ : आप का सुरूर!!!
-------------------------------------------------------------------------

आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!

-------------------------------------------------------------------------
Joke on bird
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का?

...

अंगात मस्ती , दुसरं काय ?
-------------------------------------------------------------------------

घर घ्यावं ' पाहून'!

नवं घर घेताना तुमच्या इस्टेट एजंटकडून कधीही कानी पडू नयेत, अशी काही विधानं...

छे छे! तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिलीये. तुमच्या बिल्डिंगचा फक्त मागचा भागच एका दफनभूमीवर उभारलाय!

...........................................................................

अहो , एका बाथरूमच्या फ्लशमधून पाण्याऐवजी रक्ताचा फवारा येतो , इतक्या फुटकळ कारणासाठी हे घर भुतानं झपाटलेलं ठरवणार तुम्ही?!!!

..................................................................................

हे पाहा! तुमच्या आधीच्या भाडेकरूनं अगदी स्पष्टपणे सांगितलंय की या घरातल्या माशा चावल्यावर फक्त दोन दोन इंचाचे फोड येतात. पू होऊन ते फुटतात चार दिवसांत. पण, त्या विषारी नाहीयेत अजिबात!

........................................................................................................................

अहो , मृत्यू प्रत्येक घरात होतो , या घरातही झाला. आणि सरकारी वकील तो खून होता , असं सिद्ध नाही करू शकले कोर्टात!

... आणि हो, तुमच्या शेजारीच हिमेश रेशमियाची म्युझिक रूम आहे!!!
-------------------------------------------------------------------------
jokes on zoo and kids
पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''

'' अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.''

इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्ान् पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला. पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत?''

पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.''

आता दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं नाव
शेंगदाणे
-----------------------------------------------------------------------------

Good marathi quotes | More marathi jokes, SMS, messages

0 comments:

SHARE