pahila paus : marathi kavita/poem on paus

All are waiting for mansoooooon, don't really no when is going to start but just take a look at this coool marathi kavita on paus(RAIN). Enjoy....

1.Pahila paus kavita

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
---------------------------------------------------------


---------------------------------------------------------
2. पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
---------------------------------------------------------
3.  काळे मेघ दाटले

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात

Enjoy....
Have Fun This Mansooooon.........

Click here for more poems / wishes and funny SMS

2 comments:

Anonymous said...

Chanlya kavita aahet

Anonymous said...

very nice poems
mala khup aavadalya

SHARE