तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.
गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल जंगल आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही. कमल हसन च्या "हिदुस्थानी" नावाच्या सिनेमामध्ये खुप सरे झेब्रे दाखवले होते त्यामुळे सिनेमावाले झेब्रे पाळत असल्याची मला शक्यता वाटते.पण सलमान खान नावाचा नट हरणांच्या शिकारीबरोबरच झेब्र्याची सुध्धा शिकार करत असल्याची शक्यता असल्याने सध्या सिनेमात झेब्रे दाखवत नाहित. मला "किंगकॉग" नावाचा अस्वलाचा सिनेमा आवडतो.
ईसापनितीमध्ये गाढवाच्या खुप गोष्टी आहेत. माझी आज्जी मला रोज झोपताना गोष्टी सांगते. पण ईसापनितीमध्ये गाढवाला नेहमीच बावळट म्हणुन दाखविले आहे, हे चुकिचे आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे गाढवाला पदार्थांची चव कळत नाही. पण मला गोड पदार्थांची चव खुप आवडते. माझे "बाबा" व "शाळेचे गुरूजी" पण मला नेहमी "गाढव आहेस" असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा माझी आई माझा खुप लाड करते, म्हणुन ती मला खुप आवडते. ती मला गोड्-गोड पदार्थ खायला देते.
गाढवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते खुप लाथा मारते. "WWF" नावाच्या खेळात "BATISTA" नावाचा प्राणी सुध्धा खुप लाथा मारतो पण तो गाढव नसुन रेडा आहे. माझा दादा म्हणतो त्या खेळातिल सर्व काही खोटे असते त्यामुळे मला तोच गाढव असल्याची शंका येते. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने मला गाढवासारख्या लाथा मारल्या.पण मला "WWF" पहायला खुप आवडते. अजुन १ गोष्ट म्हणजे गाढव रात्री खुप जोरात "ढोंच्यु .... ढोंच्यु" असे ओरडत बसते त्यामुळे माझी झोप मोड होते. मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. त्यामुळे कधिकधी मला खुप रडु येते.
माझे बाबा म्हणतात की "गाढवाच्या मागे व साहेबाच्या पुढे कधी उभे राहु नये" साहेब व गाढव यांच्यातिल संबंध मला काहि कळला नाही. कदाचित ते पण लाथा मारत असावेत. तसा माझा साहेब सुध्धा गाढवच आहे. म्हणुन मी त्यांच्या पुढे ऊभे न राहता शेजारी ऊभे राहतो.
गाढव शक्यतो रस्त्यावर राहते. भारतात रस्त्यावर भिकारी पण राहतात. काहि दिवसांपुर्वी भिकार्यांवर "ट्राफिक सिग्नल " नावाचा सिनेमा आला होता. तो मला मुळीच आवडला नाही. खुप घाण सिनेमा होता. आपल्याकडे " आडला हरि गाढवाचे प्पय धरी " अशी १ म्हण आहे. पण तो पुढचे धरतो का मागचे ते मला माहित नाही. अजुन १ गोष्ट म्हणजे त्या म्हणीतिल "हरि" मी नसुन दुसरा कोनी तरी आहे. तो कोण आहे हे मला माहीत नाही.
"गाढवीच्या" अशी एक शिवी सुध्धा आहे. मला अजुन खुप शिव्या येतात पण माझे बाबा मला शिव्या दिल्यावर मारतात. पण एकंदरित शिवीगाळ चांगली नव्हे त्यामुळे मार बसतो. माझी ताई सकाळी पाणी "गाळ" आहे असे ओरडत होती, मी तिला गाढव म्हणतो.

0 comments:
Post a Comment