crazy friendship poem marathi

साले हे मित्र असतात बाकी मस्त

> "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"
> "
तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"

>
हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> "
नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!
>
निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!
>
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!
>
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!
> Break-up
नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
>
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी,
>
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं!
>
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

>
मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
>
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा







very funny poem on friendship marathi hindi english, crazy poem for friends

0 comments:

SHARE